मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

शनिवार, 6 अप्रैल 2013

नैतिक मूल्यांना बैठकच नाही. चित्र प्रत and original

नैतिक मूल्यांना बैठकच नाही.
--तरुण भारत दिवाळी 1987

नैतिक मूल्यांना बैठकच नाही
लीना मेहेंदळे
तरुण भारत / दीपावली ८७ / ४६


आज आदर्श म्हणून पाहावे अशी मंडळीच समाजात आढळत नाहीत. वास्तविक राजकीय आणि शासकीय या दोन गोष्टींच्या पलिकडे जाऊन जो समाज असतो तोच खरा सत्ताधिश आणि सर्वशक्तिमान असतो.

आज समाजमध्ये शिस्त नाही. नैतिक मूल्यांची बैठक नाही. कारण या गोष्टीला महत्व नाही असेच मानले जात आहे. ही स्थिती चांगली नाही.

शैक्षणिक असमानतेबद्दलही असेच म्हणता येईल. प्रत्येक माणूस समान बुद्धिमत्तेचा नाही हे तर खरेच. पण प्रत्येकात काही ना काही सुप्त गुण असतात. ते वाढवायला वाव मिळतो की नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आज ज्या शैक्षणिक संस्था निघतात त्या , वर्षात आर्थिकदृष्या भरभराटीला आलेल्या दिसतात. याचा स्पष्ट अर्थ असा की, शिक्षण क्षेत्रास बाजारी स्वरुप आले आहे. पूर्वीच्या काळी महर्षी कर्वे, म. फुले कर्मवीर भाऊराव पाटील आदींनी जे प्रयत्न केले ते केवळ शिक्षणासाठी, त्याच्या प्रसारासाठी. हा फरक लक्षात घतला पाहिजे. ही बाब मला गंभीर वाटते. शासन यंत्रा चांगल्या त-हेने कार्यक्षमता व्हावी यासाठी समाज काय करतो ? असा प्रश्नही सतत मनात योतो.

शासनाकडून काम करुन घेण्यासाठी पूर्वीदेखील मध्यस्त असायचे. सामान्यजनांना जमणा-या गोष्टी हे लोक शासनकडून करवून देत. आजच मध्यस्त पैसैखाऊ झाले आहेत. त्याशिवाय कामेच होत नाहीत. पण तेच पैसा दिला की फाईलमधील चुकांकडे दुर्लभ करुनही काम फत्ते होते अशी लोकांची समजूत करुन दिली जात आहे. असे पैसे का द्यावे लागवेत? असा प्रश्नही मात्र विचारण्याचे धाडस कोणी करीत नाही. जे चालले आहे ते चालवून घेत आहोत. याचाच अर्थ सामाजिक जबाबदारीची जाणीव कम किंवा नष्ट होऊ लागली आहे. ही बाब चिंतनीय आहे, गंभीर आहे.

एकदा अशीच चर्चा चालू होती. लोकांचे म्हणजे असे की, पैसा घेऊनही जो काम करीत नाही तो भ्रष्टाचारी. पैसा घेऊन काम करणारा लोकांना चालतो. त्यामुळे जो पैसा देत नाही देऊ शकत नाही त्याची काम रेगाळतात. आज शंबर दिले तर उद्या हजार द्यावे. लागतात. आणि हजार रुपये देऊ शकणारा काय सामान्य माणूस असतोपैसा का द्यावा लागावा. त्याला विरोध का केला जाऊ शकत नाही. एकूणच हे सामाजिक दुष्टचक्र स्वीकारले गेले आहे ही बाबच चिंताजनक आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण उत्तम शिक्षण मिळण्यासाठी आपण आपल्या मुलांना चांगल्या शाळेत घालतो. पण तरी देखील त्यांना चांगले शिक्षण मिळते का ? देशातील ३० ते ४० टक्के मुलांची स्थिती अशी आहे की त्यांना शाळेचे तोंडही पाहता येत नाही. ज्या ठिकाणी शिक्षणच मिळत नाही आणि ज्या थोडयांना मिळते त्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. तेथे सामाजिक उन्नतीचे नावच नको !

नीतिमत्ता ही गुणांवर, कष्टावर आधारित हवी हे आपण विसरतो. सन्मानाने चांगले आनंदी जीवन जगायचे तर त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत हे आपण जाणत नाही. कष्टशिवाय ऐषारामात जगायला मिळावे, पैसा
मिळावा अशी आपली मागणी आहे. ही विचारसरणी सर्वधा चूक आहे. ही परिस्थिती सुधारली पाहिजे यात वाद नाही. पण त्यासाठी आपल्याला. शासनाकडे किंवा राजकीय पक्षांकडे बोट दाखवून चालणार नाही. विचारवंत मंडळी सामाजाला शिकवण देत असतात. पण देशात आज ख-या विचारवंताचीच वानवा आहे. ज्याच्यापुढे मान झुकवावी अशी माणसे फार थोडी आहेत. समाजात शिक्षण कोणत्या प्रकारचे दिले जाते त्याला फार महत्तव आहे. देशात उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांचा विचार करुन समाजातील किती विचारवंतांनी पुढाकार घेऊन योजना आखल्या आहेत ? 'क्थ्ठ्ठद्धत्द्यन््र दृढ ढ़दृठ्ठथ्' पहायला मिळत नाही. आपल्याला काय हवे ते ठरलेले नाही. त्यामुळे डोळ्यासमोर चित्र स्पष्ट नाही. सारेच धूसर कल्पनाशक्तीचा अभाव फार जाणवतो. एखादी गोष्ट नेमकी कोठे चुकते हे तरी या विचारवंतांनी सांगायला हवे. पण ठाम योजना कोमासमोरच नाही. समाजाला नाही. यामुळे त्यावर उपाय शोधणे तर दूरच. आपण अद्याप चाचपडतच आहोत. म्हणूनच समाजाने म्हणजेच पर्यायाने आपणच प्रत्यक्ष विचार करुन कृती करायला हवी.

समाजाला दिशा मिळते ती शिक्षणातून. म्हणून शिक्षणाला अग्रक्रम द्यायचा असे ठरवून विचार केल्यास आजचे शिक्षण चरितार्थ चालविण्यास उपयोगी आहे का ? हे प्रथम विचारात घेतले पाहिजे. व्यावसायिक शिक्षणाची कास धरली पाहिजे. सरकारने शिक्षणासाठी केलेली तरतूद अपूर्ण असते. एवढेच नव्हे तर शिक्षणासाठी सगळा पैसा खर्च केला तरी, तो अपूर्णच पडेस. त्याला कारण वाढती लोकसंख्या. ही पैशाची तूट कशी भरुन निघू शकेल याचा आपण विचार करायला हवा.

यावर उपाय म्हणजे जी मुले उच्च शिक्षण घेत आहेत त्यांनी एक दो वर्षे पहिली ते सातवी या वर्गातील विद्यार्थांना शिकवले पाहिजे. उच्च शिक्षणासाठी खरी बुद्धिमान मुलेच जाऊ शकतात. या मुलांच्या शिक्षणसाठी पालकांचा जेवढा खर्च होतो त्याच्या शंभरपट खर्च समाजाचा म्हणजेच सरकारचा होतो. तेव्हा समाजाचे देणे किंवा ऋण म्हणून ही परतफेड व्यवहास हवी. त्यासाठी बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेणा-या मुलांनी हा मार्ग अनुसरण जरुर आहे. त्यांच्यावर तसे बंधन असणे जरुर आहे. प्राथमिक शिक्षकाच्या पेशाकडे, ज्यांना इतरत्र वाव मिळत नाही, असेच लोक वळतात.

खआच्या स्तरामधील लोकांची मुले शाळेत जात नाहीत. कारण घरकामाला त्यांचा उपयोग होतो. मोठी मुले लहान भावंडाना सांभाळतात. पण त्यामुळे या मुलांचे शैक्षणिकदृष्टया फार नुकसान होते. मुलांनी शाळेत जावे यासाठी पाळणघरांची योजना मोठया प्रमाणावर राबविली गेली पाहिजे.

शिक्षणाच्या अभावामुळे समाजात तर्कशुद्ध विचारसरणी आढळत नाही. लोकांच्या भावना भडकावून देऊन जातीय दंगली घडवून आणल्या जातात. मागासवर्गीय जातीजमाती या सारखा भेदभाव केला जातो. शिकलेला माणूस सहजासहजी वाहवत जात नाही. केवळ नोकरीमुळे समाज उन्नत होत नाही. उद्योजकता हे उन्नतीर्च द्योतक आहे. त्यासाठई शिक्षण हवेच. श्रमाला प्रतिष्ठा असते हे शिक्षणामुळे आपल्याला लक्षात येते. आज स्वतंत्र्य मिळून ४० वर्षे होऊन गेली तरी स्थिती सुधारण्याऐवजी काळजी करण्याएवढी वाईट होत चालली आहे. आणि त्याला आपण संगळेच जबाबदार नाही का ?

भ्रष्टाचार शोधून काढणे आणि भ्रष्टाचारी व्यक्तिला उघडे पाडणे ही निखळ समाजाचीच जबाबदारी आहे. राजकारणाची नाही.

ज्याला शासनात सुधारणा व्हावी असे वाटते त्याने स्वतः तेथे जाऊन काय सुधारणा, कशी हवी हे दाखवून दिले पाहिजे. यासाठी महाभारतकालीन धर्मयुद्धाच्या संदर्भ देता येईल. धर्माची मूक संमता असते म्हणूच अधर्म चालतो. वेळीच योग्य गोष्टी केल्या गेल्या असत्या तर महाभारतकालीन युद्धात एवढी मुनष्यहानी झाली नसती. ज्यांनी समाज टिकावा असे वाटते त्यांनी निष्क्रिय होऊन चालत नाही. त्यासाठी रामदास, नामदेवासारखी वणवण करावी लागते.

आजकल लोकशिक्षणाची उणीव भासते आहे. वाईट माणसाचा वाईट म्हणून विरोध करुन भागणार नाही. उद्या तो आपल्या डोक्यावर बसेल हे वेळीच लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात प्रत्येक माणसाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे.
---------------------------------------------------------------------



















कोई टिप्पणी नहीं: